लाहोर – बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी क्रिकेट संघ टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करीत आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत पाकिस्तानने क्लिन स्वीप करीत दिमाखदार विजय मिळवला. या मालिकेत पाकिस्तानने प्रथमच टी-२० क्रिकेटमध्ये २०८ या डोंगरा एवढ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. एक षटक बाकी असताना, पाकिस्तानने हे लक्ष्य गाठले. या सामन्यात सलामीवीर मोहम्मद रिझवानने ४५ चेंडंूत ८७ धावा तडकावल्या. कर्णधार बाबर आझमने ५३ चेंडंूत ७९ धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी दोघांनी १५८ धावांची भागीदारी केली. सलामीवीर म्हणून बाबर-रिझवानच्या जोडीने १५० पेक्षा जास्त धावांची सलामी देण्याची यंदाच्या वर्षातील ही चौथी वेळ आहे. पाकिस्तानात फलंदाजांपेक्षा जास्त चांगले गोलंदाज सापडतात. बाबर-रिझवान जोडी अपवाद आहे.
या कामगिरीने आनंदीत झालेला पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक राशिद लतिफने बाबर-रिझवान जोडीची भारतीय फलंदाजांबरोबर तुलना केली. ही तुलना करताना राशिद लतिफने मुक्ताफळे उधळली. वर्षभरापूर्वी आम्ही बोलत होतो की, आमच्याकडे टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुलसारखे फलंदाज नाहीत, पण आता मला असे वाटते की, काही काळाने भारतीयही बोलतील, आमच्याकडे मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम सारखे फलंदाज नाहीत. राशिद लतिफने पीटीव्ही स्पोर्ट्सशी बोलताना हे वक्तव्य केले. मागच्या वर्षीच्या तुलनेत स्ट्राइक रेटमध्ये सुधारणा केल्याबद्दलही लतिफने दोघांचे कौतुक केले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …