भारताने निवडली १४ सदस्यीय नेत्रहीन टीम

नवी दिल्ली – शुक्रवारपासून भोपाळमध्ये सुरू होत असलेल्या बांगलादेशविरोधातील तीन-तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतातील नेत्रहीनांसाठीच्या क्रिकेट संघाने १४ सदस्यीय टीम्सची निवड केली. दोन्ही टीम्सचे कर्णधारपद कर्नाटक चा सुनील रमेश भूषविणार आहे, तर हरियाणाचा दीपक मलिक उपकर्णधार असेल. ही द्विपक्षीय मालिका २९ डिसेंबरला संपेल. संघाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. किवादासनावर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संक्षिप्त निवेदनामध्ये म्हटले आहे की, मालिका टी-२० सामन्यांनी सुरू होईल. या मालिकेतील सामने २४, २५ आणि २६ डिसेंबरला खेळले जाणार आहेत. त्यानंतर एकदिवसीय सामने २७, २८ आणि २९ डिसेंबर या दिवशी आयोजित केले जातील, असे डॉ. एम. जी. किवादासनावर यांनी निवेदनात सांगितले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …