भारतात ९९ हजार ९७४ कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, १२६ कोटी ७६ लाख लोकांचे लसीकरण

 

नवी दिल्ली – भारतात ९९ हजार ९७४ कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आढळलेल्या ३ कोटी ४६ लाख २४ हजार ३६० कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४० लाख ५३ हजार ८५६ बरे झाले आहेत. कोरोनामुळे देशात ४ लाख ७० हजार ५३० मृत्यू झाले. आतापर्यंत भारतात १ अब्ज २६ कोटी ७६ लाख २८ हजार ५६९ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.
देशातील ७९ कोटी ८० लाख ७७ हजार ४३९ जणांना लसचा पहिला डोस, तर ४६ कोटी ९५ लाख ५१ हजार १३० जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. आतापर्यंत ४६ कोटी ९५ लाख ५१ हजार १३० जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरण झाले असो वा नसो, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे. मास्कने नाक-तोंड झाकावे, वैयक्तिक तसेच परिसराची स्वच्छता राखावी, सॅनिटायझरने हात धुवावे, तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, सोशल डिस्टन्स राखावा; अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …