भारतात २४ तासांत कोरोनाचे ६ हजार ९८४ नवीन रुग्ण

नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६ हजार ९८४ नवीन रुग्ण मिळाले आहेत, तर २४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यादरम्यान ८ हजार १६८ लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात एकूण ८७ हजार ५६२ सक्रिय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४१ लाख ४६ हजार ९३१ लोक बरे झाले आहेत, तर एकूण मृतांची संख्या वाढून ४ लाख ७६ हजार १३५ झाली आहे.

दुसरीकडे, देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे ६१वर पोहोचली आहेत. मंगळवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे चार नवीन रुग्ण आढळून आले, तर महाराष्ट्रात या स्वरूपाचे आठ नवीन रुग्ण आढळून आले. यासह, देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटची संख्या ६१ वर पोहोचली आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …