भारतात शून्य रुपयाच्या नोटा का छापण्यात आल्या होत्या?

तुम्ही आतापर्यंत भारतात अनेक प्रकारच्या नोटा पाहिल्या असतील. १ रुपयाची नोट, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये इत्यादी अनेक चलनी नोटा भारतात चालतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत १००० रुपयांच्या नोटाही चलनात होत्या, मात्र नोटाबंदीनंतर त्या बंद झाल्या. या सर्व नोटांव्यतिरिक्त, तुम्ही कधी शून्य रुपयाची नोट पाहिली आहे का? अर्थात, ज्या नोटेची किंमत नाही, तिची गरजच काय, हे ऐकून तुम्ही थक्क झालेच असाल. अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे शून्य रुपयांची नोट भारतातच छापण्यात आली होती. भारतातील भ्रष्टाचाराची मुळे खूप जुनी आहेत. हे नाकारता येत नाही की, अनेक क्षेत्रांत वेगवेगळ्या स्तरांवर काही लोक आहेत, जे चुकीच्या मार्गाने सर्वसामान्य जनतेचा पैसा बुडविण्याचा प्रयत्न करतात. असे लोक लाच घेण्यावरही विश्वास ठेवतात. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी शून्य रुपयांची नोट भारतात छापण्यात आली, पण या नोटा रिझर्व्ह बँकेने छापल्या नाहीत.
खरंतर, २००७ मध्ये, भारतातील फिफ्थ पिलर एनजीओ, तामिळनाडूमधील एनजीओने शून्य रुपयांच्या नोटा छापल्या होत्या आणि त्या सार्वजनिकपणे वितरित केल्या होत्या. या स्वयंसेवी संस्थांनी हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये सुमारे ५ लाख नोटा वितरित केल्या होत्या आणि त्या बसस्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळ, बाजारपेठ अशा ठिकाणी लोकांना वाटल्या होत्या, जेणेकरून कोणीही कधी लाच मागितली, तर त्यांना तीच नोट द्यायची. याद्वारे त्यांना लोकांना जागरूक करायचे होते.

शून्य रुपयाच्या नोटेवर एनजीओचे नाव लिहिले होते आणि त्यावर छापण्यात आले होते – प्रत्येक स्तरातून भ्रष्टाचार संपवा. इतर नोटांप्रमाणेच या नोटेवरही महात्मा गांधींचे चित्र होते, तर मागच्या बाजूला अधिका‍ºयाचे क्रमांक लिहिलेले होते. लोकांना सांगण्यात आले की, जेव्हा कोणी लाच मागितली, तेव्हा त्यांना तीच नोट द्यावी. त्या चिठ्ठीवर लिहिले होते- ‘लाच न घेण्याची शपथ घ्या आणि लाच न देण्याची शपथ घ्या’. या नोटा बराच काळ लोकांकडे होत्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …