ठळक बातम्या

भारतात लवकरच लहान मुलांचे लसीकरण!

– पूनावाला म्हणतात, सहा महिन्यांत कंपनी कोव्होव्हॅक्स लस लाँच करणार

नवी दिल्ली/पुणे – पुणेस्थित लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टट्यिूट ऑफ इंडिया (एसआयआय) पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी कोरोना विषाणूवरील लस सुरू करण्याचा विचार करत आहे, अशी कंपनीचे सीईओ अदर पूनावाला यांनी मंगळवारी माहिती दिली. याबाबत पूनावाला म्हणाले की, जी लस मुलांसाठी तयार केली जाईल, ती नोव्हावॅक्स या अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीची कोरोना लस आहे. कोव्होव्हॅक्स या नावाने कंपनी स्थानिक पातळीवर लस तयार करून त्याचे उत्पादन करेल.
वृत्तसंस्थेने प्रसिद्धी केलेल्या वृत्तात पूनावाला म्हणाले की, आम्ही मुलांमध्ये गंभीर आजार पाहिलेला नाही. सध्या मुलांची काळजी करण्यासारखे काही नाही, मात्र आम्ही त्यांच्यासाठी सहा महिन्यांत लस आणू. ही लस तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी उपलब्ध असावी, अशी अपेक्षा आहे. अदर पूनावाला दिल्लीत एका इंडट्री कॉन्फरन्समध्ये बोलत होते. ते म्हणाले, आमच्या कोव्होव्हॅक्स लसीची चाचणी सुरू आहे. लसीने तीन वर्षांच्या वयोगटापर्यंत सर्व बाबतीत उत्कृष्ट डेटा दर्शविला आहे. ही लस येत्या सहा महिन्यांत लाँच होणार आहे. दरम्यान, जगातील अनेक देशांमध्ये लहान मुलांना लस दिली जात आहे. याचबरोबर, अदर पूनावाला यांनीही लहान मुलांचे लसीकरण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, हो, मला वाटते की, तुम्ही तुमच्या मुलांना लस द्यावी. यामध्ये कोणतेही नुकसान नाही, या लसी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. फक्त सरकारच्या घोषणेची वाट बघा आणि मगच या दिशेने पुढे जाता येईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …