बंगळुरू – कोरोनाच्या काळात बोगसगिरीची अनेक प्रकरणे समोर आली. आता ओमिक्रॉनने भीती निर्माण केलेली असतानाही ही बोगसगिरी थांबलेली दिसत नाही. कारण कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचा जो पहिला रुग्ण सापडला, त्याने देशातून पळ काढल्याचे उघड झाले आहे. कर्नाटकच्या प्रशासनाने त्याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे ओमिक्रॉनच्या या रुग्णाने कोरोनाचा नेगेटीव्ह अहवाल दाखवून पळ काढल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्याची कुठलीही चाचणी झालेली नसताना सुद्धा त्याला कोरोनाचा अहवाल कुठून मिळाला याचा आता शोध घेतला जात आहे. पण पहिला रु ग्ण सापडला आणि तो पळूनही गेल्याची नोंद आता झाली आहे, परंतु या घटनेने अनेक प्रश्नांनाही जन्म दिला आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ओमिक्रॉनचे दोन रु ग्ण सापडले आहेत. त्यातला पहिला रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरूत आलेला होता. तोही दुबई मार्गे. तो आला त्याचवेळेस त्याची एअरपोर्टवर कोरोना चाचणी केली गेली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याची ओमिक्रॉनची चाचणीही केली गेली. त्याच्या अहवालाची प्रतिक्षा होती. २१ नोव्हेंबरला त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि २७ नोव्हेंबरला तो देश सोडून आफ्रिकेला पळालाही. यादरम्यान त्याने एका खासगी प्रयोगशाळेचा निगेटीव्ह अहवाल मिळवला. तो कसा मिळवला त्याची माहिती अजून उघड होणे बाकी आहे. पण ओमिक्रॉनचा अहवाल आल्यानंतर पालिकेचे अधिकारी त्याचा शोध घेत हॉटेलवर पोहोचले त्यावेळेस त्याने कधीचच हॉटेल सोडल्याचे त्यांना कळवण्यात आले. त्यानंतर तो पळून गेल्याचे स्पष्ट झाले. हा रु ग्ण एका फार्मा कंपनीचा प्रतिनिधी होता.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …