नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौरा निश्चित झाला होता. मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा एक आठवडा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे. याचबरोबर या अधिकाऱ्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबतचा निर्णय हा खेळाडूंच्या सुरक्षितता लक्षात ठेवून घेण्यात येईल, असेही सांगितले.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘आम्ही ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा एक आठवडा पुढे ढकलण्याबाबत चर्चा करत आहोत. याबाबत भारत सरकारचे काय म्हणणे आहे, याचीही आम्ही वाट पाहत आहोत. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड याबाबत सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत. प्रत्येक गोष्टीवर चर्चा केली जाईल. आमचे खेळाडूंच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असेल’, असे वक्तव्य एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा हा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारत तीन कसोटी सामन्यांची मालिका, तीन एकदिवसीय आणि चार टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयने या बाबतीत सरकारशी सल्लामसलत करावी असे सांगितले होते.
अनुराग ठाकूर यांनी ‘फक्त बीसीसीआयच नाही, तर प्रत्येक क्रीडा संघटनेने कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन ज्या देशात आढळून आला आहे तेथे आपले संघ पाठवण्यापूर्वी सरकारशी चर्चा करावी. ज्या देशात धोका आहे त्या देशात संघ पाठवणे योग्य नाही. ज्यावेळी बीसीसीआय आमच्याशी चर्चा करेल त्यावेळी आम्ही त्यांना हे सांगू’, असे बागपथ येथे बोलताना सांगितले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …