ठळक बातम्या

भारताचा गोल्डन बॉय नीरज ब्रेकनंतर परतला मैदानावर

नवी दिल्ली – टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकत नीरजने इतिहास रचला होता. या सुवर्ण कामगिरीनंतर काही काळ विश्रांती घेत नीरज सुटीची मजा घेत होता. त्यानंतर आता त्याने पुन्हा सरावाला सुरुवात केली असून, नुकतीच त्याच्या सोशल मीडियावरून सरावाचे फोटो शेअर केले. नीरजने हे सरावाचे फोटो ट्विट करत लिहिले आहे की, ‘पहिली जिंकायची जितकी भूक आणि इच्छा होती, तितकीच आताही आहे. मागील आॅलिम्पिकप्रमाणे सरावाला सुरुवात करणे भारीच आहे. मला दिलेल्या पाठिंब्यासह विविध मेसेजससाठी सर्वांचे धन्यवाद.
भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर इतका भालाफेक केला. दुसºया वेळी त्याने ८७.५८ मीटर इतका लांब भालाफेक करून आपले पहिले स्थान कायम ठेवले. तिसºया थ्रोमध्ये ७६.७९ मीटर थ्रो फेकला तरी अद्यापही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीच सुवर्णपदक खिशात घातले होते. त्यामुळे नीरजचा ८४ मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक ठरले.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *