भाजप नेते प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण

मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द दरेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिली.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कोरोनासदृष्य लक्षणे आढळून आल्यानंतर आपली चाचणी करून घेतली. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून, उपचार सुरू केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. याआधी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, भाजप नेते सुजय विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, तसेच त्यांचे कुटुंबीय, अशी अनेक नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …