भाजप खासदार गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा गंभीर धमकी

नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू व भाजपचे विद्यमान खासदार गौतम गंभीर यांना अवघ्या सहा दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी रविवारी पुन्हा एकदा देण्यात आली आहे. कथितरित्या ‘आयसीस-काश्मीर’ नेही धमकी दिल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानंतर खा. गौतम गंभीर यांची व त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. यावेळी तर दहशतवाद्यांनी गंभीर यांना आमचे खबरी दिल्ली पोलिसांत असल्याची धमकी दिली. गंभीर यांच्याबाबत सर्व महिती मिळत असल्याचंही दहशतवाद्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय. गंभीर यांना तिसऱ्यांदा धमकी मिळाल्यानं खळबळ माजली आहे.
कुख्यात ‘आयसीस-काश्मीर’नेगौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक मेल पाठविण्यात आला आहे. ‘दिल्ली पोलिस आणि आयपीएस अधिकारी श्वेता हेआमचे काहीही नुकसान करू शकत नाही. आमच्याकडे हेरगिरी करणारेपोलीस आहेत. तुमची सर्वमाहिती आमच्याकडेपोहचत आहे, असे या धमकी देणाऱ्या ई-मेलमध्ये नमूद आहे. त्यानंतर गंभीर यांचेखासगी सचिव गौतम अरोरा यांनी पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान, गौतम गंभीर यांना धमकी मिळाल्यानंतर संबंधित मेल पाठविणाऱ्याचा पोलिस प्रशासन शोध घेत आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, गेल्या मंगळवारी आणि बुधवारी सुद्धा गौतम गंभीर यांना अशाच प्रकारे धमक्या दिल्या होत्या. तेव्हा सुद्धा ‘इसिसकाश्मीर’ने मेल पाठविले होते. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आम्ही संपवू असे, त्यात म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी ‘गुगल’शी संपर्क साधत पुढील कारवाई केली. गेल्या बुधवारी दुपारी २ वाजून ३२ मिनिटांना ई-मेलवरून धमकी मिळाली होती. या ई-मेलसोबत गौतम गंभीर यांच्या घराचा एक व्हिडिओ सुद्धा सलग्नित करण्यात आला होता. ‘आम्ही तुम्हाला (गंभीर) जीवे मारणार होतो. मात्र, तुम्ही काल बालंबाल बचावले आहात. जर तुम्हाला तुमच्या परिवाराची चिंता असेल तर, राजकारण आणि काश्मीरपासून दूर रहा’, असा इशारा त्यातून देण्यात आला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …