ब्रेकींग न्यूज: तुर्भे एमआयडीसीतील वर्कशॉपला भीषण आग; ४० -४५ गाड्या जळून खाक

नेरुळ: नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील डी-२०७ येथील बीएमडब्ल्यू वर्कशॉपला भीषण आग लागली. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत लाखो रुपये किंमतीच्या ४० ते ४५ बीएमडब्ल्यू गाड्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसीसह कोपरखैरणे, नेरुळ आणि शिरवणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि शथीर्चे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी सुमारे सहा तासांचा अवधी लागला. आग आटोक्यात येईपर्यंत बरंच नुकसान झालं होतं. वर्कशॉपमधील आॅफिससह सर्व फर्निचर आणि कागदपत्रं जळून खाक झाली आहेत. आगीचं कारण अद्याप तरी अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तुर्भे पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून जागेचा पंचनामा करण्यात आला आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …