ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात

 

नवी दिल्ली – जगातील तब्बल ३८ हून अधिक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची नोंद झाली आहे. सर्वप्रथम आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण आता अमेरिका, यूके, युरोप आणि भारतातही समोर येत आहेत. या ठिकाणी ओमिक्रॉन वेगाने पसरताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडलाही सुरुवात झाली आहे. येथे ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या अनेकांना कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लागण होत आहे. जाविद यांनी यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने जारी केलेल्या डेटाचाही उल्लेख केला, यात वैज्ञानिकांनी ओमिक्रॉनचा कालावधी डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच हा व्हायरस किती घातक आहे आणि यावर लसीचा काय परिणाम होईल हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे हा व्हेरिएंट आपल्याला रिकव्हरीच्या पटरीवरून उतरवेल की नाही, आपण काहीही निश्चितपणे सांगू शकत नाही, असेही जाविद यांनी म्हटले आहे.
यूकेचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी संसदेत सांगितले की, देशात कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लागण झालेले ३३६ लोक समोर आले आहेत. इंग्लंडमध्ये ओमिक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड होतानाही दिसत आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत २६१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. स्कॉटलंडमध्ये ७१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर वेल्समध्ये ४ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. साजिद जाविद म्हणाले की, ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही लोकांना ओमिक्रॉनचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे इंग्लंडमधील अनेक भागांत कम्युनिटी स्प्रेड होत असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलो आहोत. आम्ही नशिबावर काहीही सोडत नाही. जगातील शास्त्रज्ञ या नव्या व्हेरिएंटसंदर्भात माहिती एकत्र करत असतानाच, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटविरोधात आपली एक बचाव यंत्रणा बळकट करणे हे आमचे धोरण आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …