कोरोनाने अचानक संपूर्ण जगाला अशी परिस्थिती आणून दिली की, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. वटवाघुळ आणि कोरोना व्हायरसपासून या साथीचा उद्रेक समोर आला. अशीच भीती ब्रिटनच्या अनेक समुद्रकिनाºयांवर लोकांमध्ये दिसली. खरं तर, ब्रिटनमधील अनेक समुद्रकिनाºयांवर अचानक लोकांची नजर हजारो मेलेल्या खेकड्यांच्या ढिगाºयावर पडली. किनाºयावर पडलेल्या या मृतदेहांचा ढीग पाहून लोक घाबरले. कोणालाच समजले नाही की, हे असे कोणते कारण आहे, ज्यामुळे हे खेकडे मरायला लागले आहेत?
ब्रिटनच्या अनेक समुद्रकिनाºयांवर अचानक लोकांची नजर हजारो खेकड्यांच्या मृतदेहांच्या ढिगाºयावर पडली. यामध्ये मर्स्के आणि सॉल्टबर्न आॅफ टीसेड सारख्या समुद्रकिनाºयांचा समावेश आहे. कारेव बीचवर सेहमच्या सीटवरही अशीच घटना दिसली. या ठिकाणी कंबरेपर्यंत खेकडे जमा झाले होते. त्यात हजारो मरण पावले आणि अनेक जीवंत राहिले. या वृत्ताला पर्यावरण संस्थेनेही दुजोरा दिला आहे. इतके खेकडे नेमके कोणत्या कारणामुळे मारले गेले याचा तपास आता सुरू झाला आहे.
मर्स्के येथे राहणाºया शेरॉन बेलने सांगितले की, ती दररोजप्रमाणेच तिच्या घरातून समुद्राजवळ फिरायला गेली होती; मात्र अचानक किनाºयावर खेकड्यांचा ढीग असल्याचे दिसले. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्या संख्येत वाढ झाली होती; मात्र २५ आॅक्टोबरला त्यांची संख्या हजारोंच्या घरात होती. तिने लगेच नवºयाला फोन केला. दोघांनी येऊन तिथला साठा घेतला. यानंतर दोघांनी त्याचे अनेक फोटो काढले. काही तासांच्या तपासानंतर दोघांनी त्यात उपस्थित जीवंत खेकडे परत पाण्यात टाकले. शेरॉनने सांगितले की, हे खूपच विचित्र आहे. आजच्या आधी तिने असे काही पाहिले नव्हते.
शेरॉनने मीडियाला सांगितले की, ती गेल्या २१ वर्षांपासून मर्स्के बीचजवळ राहत आहे. आतापर्यंत अनेकवेळा समुद्र किंवा वादळ मध्यभागी धडकले; पण तिने याआधी असे काही पाहिले नव्हते. या घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वी असाच काहीसा प्रकार उत्तर सेहममध्ये पाहायला मिळाला होता. याबाबत तेथील स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. हा निसर्गाचा इशारा असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. काहींना असेही वाटते की, पाण्यात कोणीतरी काहीतरी मिसळले आहे, ज्यामुळे ते मरत आहेत.
पर्यावरण संस्थेने प्रसारमाध्यमांना सांगितले की, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय त्याच्या मृत्यूचे कारण काय, हे शोधण्यासाठी खेकडाही तपासासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यात साथीचा रोग पसरला आहे की, आणखीन काय, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात खेकडे मरण पावले. सध्या त्याचे नमुने पाठवण्यात आले आहेत. तपासानंतरच गोष्टी स्पष्ट होतील.