दुबई – न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रँट बोल्टने अपेक्षा वर्तवली की, आयसीसी टी-२० विश्वचषकात रविवारी महत्त्वाच्या सामन्यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांच्या कमकुवतपणाचा फायदा त्याचप्रकारे घेणार, ज्याप्रकारे पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने घेतला होता.
पाकिस्तानला २१ वर्षीय शाहीनने आपल्या सुरुवातीला दोन षटकात रोहित शर्मा व लोकेश राहुलचे विकेट मिळवून दिले. पाकिस्ताने या सामन्यात १० विकेटने विजय मिळवला होता. भारताच्या पहिल्या फळीला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध बाद होताना पाहून, बोल्टला दोन्ही देशांत नॉकआऊटप्रमाणे होणाऱ्या सामन्यात त्याचप्रकारे कामगिरी करायची आहे. तो म्हणाला की, त्या दिवशी शाहीनने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, एका डावखुऱ्या गोलंदाजाच्या रूपात ते पाहणे माझ्यासाठी अद्भूत होते. माझा चेंडूही थोडा स्विंग करतो व त्याच दृष्टिकोनातून मी अपेक्षा करतो की, मी देखील ते करू शकतो, जे शाहीनने त्या रात्री केले. बोल्टने अनेक वेळा भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले आहे, ज्यात २०१९ वनडे विश्वचषक सेमिफायनल सामन्याचा समावेश आहे. त्याने त्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला बाद केले होते, त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने रोहित व राहुलला माघारी धाडलेले. ज्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ धावांत आपले ३ विकेट गमावले होते. बोल्ट म्हणाला, भारताकडे शानदार फलंदाज आहेत. अशात गोलंदाजी चमूच्या रूपात आमच्याकडे एका डावाच्या सुरुवातीला विकेट घेणे गरजेचे आहे. स्पर्धेत आतापर्यंत धावांचा पाठलाग करणारे संघ विजयी राहिलेत. बोल्ट म्हणाला की, भारतविरुद्ध अनेक आव्हान असतील. त्यांच्याकडे शानदार फलंदाजी क्रम आहे. आम्हाला आता त्यांना बाद करण्याबाबत विचार करावा लागेल. आम्ही प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना होईल तितके जास्त लक्ष्य देण्याचा प्रयत्न करू. न्यूझीलंडलाही पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला असता. दोन्ही संघ विजयासह आपले खाते खोलू पाहतील. बोल्ट म्हणाला की, संघातील खेळाडू भारताचा सामना करण्यास उत्साहित आहेत. आम्ही पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम सुरुवात करण्यास अपयशी राहिलो. विश्वचषकात नेहमीच न्यूझीलंडचे भारतविरुद्ध पारडे जड राहिले आहे, पण बोल्टला असे वाटत नाही. तो म्हणाला, मी हे नाही बोलणार की, आमचे पारडे जड आहे. दोन्ही संघात अनेक सर्वोत्तम आहे. काही खेळाडूंनी येथे आयपीएलमध्ये भाग घेतला, त्यामुळे नक्कीच भारतीय खेळाडूंसोबत आमचे नाते बळकट देखील आहे.