बोटाच्या दुखापतीमुळे लिविंगस्टोनचे विश्वचषक खेळणे संशयाच्या भोवºयात

 

लंडन – इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिविंगस्टोनच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकात खेळणं संशयाच्या भोवºयात आहे. त्याला भारतविरुद्ध दुबईत सराव सामन्यात दुखापत झाली. स्काय स्पोटर््सच्या बातमीनुसार, इंग्लंड पुढील २४ तास त्याच्या दुखापतीवर नजर ठेवेल. भारताने हा सामना सात विकेटनं जिंकला. सामन्याच्या अखेरच्या क्षणी सीमारेषेवर झेल घेण्याची प्रयत्नात लिविंगस्टोनला दुखापत झाली. त्याने २० चेंडंूत ३० धावा केल्या व दोन षटकार १० धावा घेत एक विकेट मिळवला. त्याला स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सच्या जागी संघात ठेवण्यात आले. स्टोक्स मानसिक आरोग्यामुळे क्रिकेटपासून लांब आहे. इंग्लंडला बुधवारी न्यूझीलंडकडून आणखीन एक सराव सामना खेळायचा आहे. विश्वचषकात ते वेस्ट इंडिजविरुद्ध शनिवारपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करतील.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *