ठळक बातम्या

बॉलीवूड निर्माता विजय गलानी यांचे निधन

सलमान खानच्या वीरसह अनेक चित्रपटांची निर्मिती करणारे बॉलीवूड निर्माता विजय गलानी यांचे लंडन येथे निधन झाले. विजय गलानी यांना कर्करोग झाला होता व त्यांच्यावर
लंडन येथे उपचार सुरू होते.

विजय गलानी यांनी २०१० मध्ये सलमान खान अभिनित वीर या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनी सलमान खानपासून अक्षय कुमारसारख्या कलाकारांसोबत अनेक चित्रपट
बनवले होते. विजय गलानी यांना कर्करोग झाला होता आणि त्यावरील उपचारासाठी ते लंडनला गेले होते. विजय गलानी यांनी अनेक हिट चित्रपट प्रोड्यूस केले होते. ज्यात १९९२मध्ये

आलेला चित्रपट सूर्यवंशी आणि अचानक यांचा समावेश आहे. विजय गलानी यांनी २००१मध्ये आलेला चित्रपट अजनबीदेखील प्रोड्यूस केला होता ज्यात अक्षय कुमार, बॉबी
देओल, करिना कपूर व बिपाशा बसू आदी कलाकार दिसून आले होते. विजय गलानी यांनी जानेवारीमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेली पॉवर ही फिल्मदेखील प्रोड्यूस केली होती. ज्यात

श्रुती हसन, विद्युत जामवाल व प्रतिक बब्बरसारखे कलाकार दिसून आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …