ठळक बातम्या

बॉडी शेमिंग झाल्याने भडकली रुबीना दिलैक

कोविड संक्रमणातून ठिक झाल्यानंतर बिग बॉस-१४ ची विजेती आणि अभिनेत्री रुबीना दिलैक हिचे वजन चांगलेच वाढले आहे. रुबीना याविषयी नेहमी आपले विचार शेअर करत असते. खरेतर काही चाहते तिचे वजन वाढत असल्याने सतत तिचे बॉडी शेमिंग करत आहेत. यापैकी काही ट्रोलर्स तर असेही आहेत जे रुबीनाला सातत्याने तिरस्कारयुक्त मेसेज पाठवत असतात. आता रुबीनाने एका नोटद्वारे अशा मंडळींना सडेतोड उत्तर दिले आहे.

रुबीनाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने आपल्या बनावट चाहत्यांकरिता लिहिले आहे, ‘प्रिय शुभचिंतक, मी पाहत आहे की, माझे वाढलेले वजन तुमच्याकरिता खूप त्रासदायक ठरत आहे. आपण सातत्याने मला तिरस्कारयुक्त मेसेज आणि मेल करत आहात. जर मी कोणताही पीआर हायर केलेला नाही किंवा मी पब्लिकला टीप नाही देत तर आपल्याला माझी योग्यता दिसत नाही. आपण मला फॅनडम सोडण्याची धमकी देत आहात, कारण आज मी जाड झाले आहे. मी चांगले कपडे घालत नाही आणि मी मोठे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी मेहनतही घेत नाहीये. मी खूप निराश आहे की, आपल्याकरिता माझे फिजिकल अपिअरन्स माझ्या टॅलेंट आणि कामासाठी माझ्या कमिटमेंटपेक्षाही महत्त्वाचे ठरते. हे माझे आयुष्य आहे आणि त्याचे अनेक टप्पे आहेत आणि आपणदेखील माझ्या आयुष्याचा हिस्सा आहात. मी आपल्या चाहत्यांचा आदर करते. त्यामुळे स्वत:ला माझे फॅन म्हणवून घेऊ नकात.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …