ठळक बातम्या

बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशीप : सुमितची प्री क्वार्टरमध्ये झेप

बेलग्रेड – भारतीय बॉक्सर सुमित (७५ किलो)ने शनिवारी येथे ताजिकिस्तानच्या अब्दुमलिक बोलताएववरील शानदार विजयाने एआयबीए पुरुष विश्व चॅम्पियनशीपच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला. सुमितने बोलताएवचा ५-० असा पराभव केला. बोलताएव सटीक ठोसे मारण्याच्या प्रयत्नात भारतीय बॉक्सरच्या जवळ जात नव्हता. सुमितला दुसऱ्या फेरीत बोलताएवच्या डोक्याच्या मागे हिट करण्यासाठी इशारा देण्यात आला, पण त्यानंतरही त्याची पकड ढिल्ली झाली नाही व त्याला सर्वसंमत्तीने विजेता घोषित करण्यात आला. शुक्रवार रात्री उशिरा निशांत देव (७१ किलो)ने मॉरिशसच्या मर्वेन क्लेयरचा ४-१ असा पराभव करत प्री क्वार्टर फायनलमधील स्थान पक्के केलेले. दुसरीकडे, गोविंद साहनी (४८ किलो) प्री क्वार्टर फायनलमध्ये जॉर्जियाच्या सखिल अलखवेरदोवीचा सामना करेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …