ठळक बातम्या

बैलगाडा शर्यतीवरील बंदी : सोमवारी सवार्ेच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली – राज्यात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीला बंदी आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून वारंवार होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. येत्या सोमवारी यासंदर्भात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचे खासकरून ग्रामीण भागांतील नागरिकांचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
तमिळनाडूमधील ‘जल्लिकट्टू’ या बैलांच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागांत बैलगाडा शर्यती होण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून त्याविषयीच्या नियमांचा मसुदा तयार केला आहे. राज्यातील विविध भागांत दिवाळीदरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतींवरील बंदी पुढील काही आठवड्यांसाठी कायम ठेवल्याने यंदाच्या दिवाळीदरम्यान राज्यात शर्यती होऊ शकल्या नव्हत्या. आता सर्वोच्च न्यायालय या बंदीवर काय निकाल देते आणि ही बंदी उठवली जाते का? आणि पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …