बेअर ग्रिल्सचा विचार बदलला…

लोकप्रिय रिअ‍ॅलिटी सर्व्हायव्हल शो ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ला होस्ट करणाºया बेअर ग्रिल्सने आता खूप मोठे विधान केले आहे. बीबीसी ४ ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना बेअर ग्रिल्सने म्हटले आहे की, शोच्या सुरुवातीला त्याने खूप साºया जनावरांना मारले होते, ज्याबद्दल त्याला खूप खंत वाटत आहे. त्याचबरोबर यापुढे शोसाठी आपण कोणत्याही प्राण्यांची हत्या करणार नाही, तर मृत जनावरेच खाऊ असेही त्याने स्पष्ट केले आहे.
बेअर ग्रिल्स म्हणाला, मला वाटते की, सर्व्हायव्हल आणि जेवण्याच्या नावाखाली मी निश्चितच सुरुवातीच्या काळात खूप सारे साप, विंचू, बेडूक आणि अन्य प्राण्यांना मारले होते. मला आता या गोष्टीची खूप खंत वाटते. आता मी त्यापासून खूप दूर आलो आहे. जर आपण इतिहासातील महान सर्व्हायव्हर्सला पाहिले तर ते नेहमी वनवासी होते. आपण इतक्या मोठ्या खेळाच्या मागे जाता आणि आपले प्राण धोक्यात टाकता. याशिवाय आपली ऊर्जाही

संपविता.
बेअर ग्रिल्सला शाकाहारी लोक, तसेच त्याच्या शोमध्ये येणाºया अनेक विगन स्टार्सकडून प्रेरणा मिळाली आहे, ज्यांनी मांसाहार करण्याबाबतचे त्याचे विचार बदलून टाकले आहेत. बेअर ग्रिल्स म्हणतो, मी अनेक शाकाहारी स्टार्सला जंगलात घेऊन गेलो आहे. हा खूप शानदार अनुभव होता आणि मी त्यांचा नेहमीच आदर करतो.

बेअर ग्रिल्सच्या या शोमध्ये आतापर्यंत विक्की कौशल, अजय देवगण, अक्षय कुमार, रजनीकांतसह अनेक भारतीय स्टार्सनी काम केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …