बॅडमिंटन : सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

नवी दिल्ली – बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी सुरू आहे. गुरुवारी स्पेनच्या कॅरोलिना मरिन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवँगवर शानदार विजय मिळवला. स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या सिंधूने चोचुवँगवर २१-१४, २१-१८ अशी सरळ सेटमध्ये मात केली.
सिंधूने संपूर्ण कोर्टवर वर्चस्व गाजवताना प्रतिस्पर्धी चोचुवँगवर ४८ मिनिटांत विजय मिळवला. या विजयासह सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने या विजयासह पराभवाची मालिका खंडित केली. याआधी झालेल्या दोन सामन्यांत चोचुवँगने तिला पराभूत केले होते. ऑल इंग्लंड ओपन आणि वर्ल्ड टूर फायनलमध्ये सिंधूला पोर्नपावी चोचुवँगकडून पराभव पत्करावा लागला होता.
गुरुवारच्या सामन्यात सिंधूने चोचुवँगला कुठेही वरचढ होण्याची संधी दिली नाही. तिने आपल्या खेळाने चोचुवँगला पूर्णपणे निष्प्रभावी करून टाकले. शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना जागतिक स्तरावरील क्रमांक १ची खेळाडू ताई यिंग बरोबर होणार आहे. तैवानच्या ताई यिंग विरुद्धचा सिंधूचा रेकॉर्ड फार चांगला नाही. ताईने गुरुवारी झालेल्या सामन्यात पिछाडीवरून भरारी घेत विजय मिळवला. तिने स्कॉटलंडच्या कर्स्टी गिलमोरचा २१-१०, १९-२१, २१-११ असा पराभव केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …