बॅडमिंटन : लक्ष्य सेन आणि श्रीकांतने पदके निश्चित केली

हुएलवा (स्पेन) – किदाम्बी श्रीकांत आणि युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन या दोघांनी शुक्रवारी येथे बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष एकेरी उपांत्य फेरीत प्रवेश क रतानाच नवा इतिहास रचत भारतासाठी किमान दोन पदके निश्चित केली. भारताचे एक रौप्य पदकही निश्चित झाले आहे. कारण शनिवारी पहिल्या उपांत्य फेरीमध्ये किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन आमने-सामने असणार आहेत. भारतासाठी ही बाब ऐतिहासिक ठरली आहे. आधी जगातील क्रमांक एकचा खेळाडू आणि येथील १२ क्र मांकावरील बॅडमिंटनपटू असलेल्या किदाम्बी श्रीकांतने नेदरलँडच्या मार्क कालजोऊवर उपांत्यपूर्व फेरीत अवघ्या २६ मिनिटांमध्ये २१-८, २१-७ ने विजय मिळवला. त्यानंतर बिगर क्रमवारीत असलेल्या लक्ष्य सेनने आपल्या चिकाटीचे शानदार प्रदर्शन करीत उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जुन पेंग झाओला तीन डावांपर्यंत चाललेल्या रोमांचक मुकाबल्यात २-१५, १५-२१, २२-२० ने पराभूत केले. हा सामना एक तास आणि सात मिनिटांपर्यंत रंगला.
या दोघांच्या आधी महान बॅडमिंटनपटू (१९८३ मध्ये कांस्य पदक) आणि बी. साई प्रणीत (२०१९ मध्ये कांस्य पदक) यांनी पदके मिळवली होती. पी. व्ही. सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पाच पदके जिंकली असून सायना नेहवालच्या नावावर दोन पदके आहेत. ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या महिला दुहेरी जोडीने सुद्धा २०११ मध्ये कांस्य पदक जिंकले होते. जगातील १४ व्या क्र मांकाचा खेळाडू असलेल्या किदाम्बी श्रीकांतने पहिल्या डावात ११-५ची आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर त्यामे १४-८ची आघाडी घेत सलग सात गुण मिळवून डाव जिंकला. दुसरा डावदेखील काही वेगळा नव्हता. या डावात श्रीकांतने आपल्या प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे गारद केले. त्याने ४-३ च्या गुणसंख्येनंतर सलग सात गुण प्राप्त केले. त्यानंतर १७-७ नंतर त्याने सलग चार अंक मिळवून सामना आपल्या नावावर के ला. पुरुष एकेरीमध्ये भारताचा तिसरा खेळाडू एच. एस. प्रणयलाही उपांत्य फेरीमध्ये दाखल होण्याची संधी आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा मुकाबला सिंगापूरच्या कीन येव लोहशी होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …