बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

कोपनहेगन – ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफामनला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सिंधूने ६७ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१६, १२-२१, २१-१५ अशा सेटमध्ये बुसाननचा पराभव केला. ऑगस्ट महिन्यात ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावल्यानंतर सिंधूची ही पहिली स्पर्धा आहे. त्यानंतर सिंधूने ब्रेक घेतला होता आणि डेन्मार्क ओपनमधून खेळण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीच्या सामन्यात सिंधूने टर्कीच्या नेस्लिहान यिगिटवर २१-१२, २१-१० असा सरळ गेममध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर सिंधूची बुसानन ओंगबामरुंगफानशी सामना झाला. दुसरीकडे, भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कारकिर्दीत जवळपास प्रत्येक महत्त्वाची स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे आता तिने फक्त ऑल इंग्लंडचे अजिंक्यपद मिळवावे, असे मत भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published.