बुलडाणा – बुलडाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची भाईिगरी पुन्हा पाहायला मिळाली. आधीचा तालुका अध्यक्ष मर्डर केसमध्ये तुरुंगात असताना, आता नव्या तालुका अध्यक्षांनी महिला ग्रामपंचायत सदस्याला चक्क मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बुलडाण्यातील स्थानिक राजकारणात चालले तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आधीचे खामगाव तालुकाध्यक्ष भरत लाहुडकार एका हत्या प्रकरणात कारागृहात आहेत, तर खामगाव राष्ट्रवादीचे नवीन तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे यांचीसुद्धा भाईिगरी आता समोर आली आहे. हिंगणेंनी एका महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. खामगाव राष्ट्रवादीचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे यांनी बुलडाण्यातील आमसरी गट ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याला काही जणांच्या साथीने मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या महिलेने पोलिसात तक्रार दिली असून, अंबादास हिंगणे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नव्या तालुका अध्यक्षांच्या विरोधात जलंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …