बुलडाण्यातील विष घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

खामगाव – एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 12 दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानावर अजूनही आंदोलन सुरु आहे. काल संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे. तसेच दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली असून २४ तासात कामावर हजर होण्याचेआदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या कामगारविरोधी धोरणाचा कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला आहे. दरम्यान, खामगाव आगाराच्या सहायक मॅकेनिक विशाल प्रकाश अंबलकार (२९) या कर्मचाऱ्याने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होते. त्याचा अकोला येथे उपचार सुरू असताना १७ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता मृत्यू झाला.
राज्य परिवहन महामंडळ आणि शासनाच्या दुर्लक्षित कारभाराचा हा बळी ठरल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. विलशा अंबलकार यांनी माटरगाव येथील राहत्या घरी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांना स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. १७ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजता विशाल अंबलकार यांची मृत्यूशी झुंज संपली. ही वार्ता शहरात पसरताच एसटी कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरल. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आपला सहकारी गेल्याबद्दल दु:ख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …