बुर्ज खलिफानंतर या देशात बांधली जगातील दुसरी सर्वात उंच इमारत

जगात उंच इमारतींची कमतरता नाही. जगातील सर्वात उंच इमारतींचा विचार केला, तर दुबईतील बुर्ज खलिफाचे नाव प्रथम येते. ज्याची उंची ८२९.८ मीटर म्हणजेच २,७२२ फूट आहे. ही गगनचुंबी इमारत पाहण्यासाठी केवळ दुबईतूनच नाही, तर परदेशातूनही लोक येतात. दुबईला जाणाºयांनी ही वास्तू एकदा पहावी. डोकं वर करून तिची उंची पाहिल्यावर मन थिरकायला लागतं, पण तुम्हाला माहीत आहे का की, जगातील दुसरी सर्वात उंच इमारत कोणती आहे? जगातील दुसरी सर्वात उंच इमारत मलेशियामध्ये आहे. मात्र, सध्या ही इमारत बांधली जात असून, ती २०२२ च्या अखेरीस तयार होईल. आता उंचीच्या बाबतीत ही जगातील दुसरी इमारत ठरणार आहे. याआधी दुसºया क्रमांकाच्या उंच इमारतीचे नाव शांघाय टॉवरच्या नावावर होते. या टॉवरची उंची २,०७३ फूट होती, मात्र आता ती तिसºया क्रमांकावर गेली आहे. बुर्ज खलिफा नंतरच्या दुस‍ºया सर्वात उंच इमारतीबद्दल मनोरंजक तथ्ये जाणून घेऊया-
बुर्ज खलिफा नंतर, जगातील सर्वात उंच इमारतीचे नाव मडेर्का ११८ आहे जे क्वालालंपूर, मलेशिया येथे आहे. मडेर्का हा इंडोनेशियन आणि मलय भाषेतील शब्द आहे ज्याचा हिंदीत अनुवाद ‘स्वातंत्र्य’ असा होतो. सध्या ही वास्तू बांधली जात आहे, पण तरीही त्याची उंची पाहून मन चक्रावू लागते. या इमारतीची उंची २,२२७ फूट असेल आणि ११८ मजले असतील.

मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार या इमारतीच्या बांधकामामुळे मलेशियातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या इमारतीत एकावेळी ३००० लोक राहू शकतात. त्याची आकर्षक रचना आहे आणि ती त्रिकोणी काचेच्या पॅनल्सने बनवली आहे. हा आकार मलेशियाच्या पारंपरिक कला आणि हस्तकला प्रतिबिंबित करतो.
ही इमारत ३१ लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधली जात आहे. या इमारतीपैकी निम्मी इमारत कार्यालयांना दिली जाणार आहे. या टॉवरमध्ये मॉल, मशीद, पार्क आणि हॉटेल असेल. इमारतीमध्ये दक्षिण पूर्व आशियातील सर्वात उंच निरीक्षण डेक बांधण्यात येत आहे.

ही जागा चार एकरात पसरली असून, त्यात सार्वजनिक जागा असणार असून, उद्यानही असणार आहे. मीडिया रिपोटर््सनुसार, या इमारतीच्या डिझाइनमध्ये मलेशियाचे माजी नेते अब्दुल रहमान यांची प्रतिमा दिसून येते, जेव्हा त्यांनी हात वर करून मडेर्का म्हटले होते. रहमान यांनी १९५७ मध्ये मलेशियाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …