बीसीसीआयने विराट कोहलीचा दावा फेटाळला

नवी दिल्ली – भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ने विराट कोहलीचा दावा खोडून काढला आहे. कर्णधारपदाच्या विषयावर बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता, कल्पना दिली नाही हा विराटचा दावा बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. टी-२० कर्णधारपदासह एकूणच सर्व विषयांवर विराटबरोबर चर्चा झाली होती. सप्टेंबर महिन्यात बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विराट कोहलीशी चर्चा करून त्याला टी-२० चे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केली होती. बीसीसीआय पदाधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला ही माहिती दिली.
बैठकीच्या दिवशी सकाळी चेतन शर्मा यांनी विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबतच्या निर्णयाची माहिती दिली होती, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवताना बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता, असे कोहलीने बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावर आता बीसीसीआयने हे उत्तर दिले आहे. मी विराट कोहलीला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको, असे सांगितले होते. सौरव गांगुलीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केले होते. विराटने मात्र वेगळेच सांगितले. टी-२० चे कर्णधारपद सोडताना बीसीसीआयमधून कोणी आपल्याला अडवले नाही. उलट हा निर्णय व्यवस्थित स्वीकारला असे सांगितले. त्यामुळे नेमके खरे कोण बोलतेय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …