नवी दिल्ली – बीसीसीआयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) अभिजीत साळवी यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. साळवी यांनी शनिवारी वृत्तसंस्थेला सांगितले की, माझ्या नोटीसचा कालावधी ३० नोव्हेंबरला संपुष्टात आला, पण त्यांनी भारत व न्यूझीलंड यांच्यात ३ ते ७ डिसेंबरपर्यंत चाललेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत आपली सेवा दिली. कोविड-१९ च्या कठीण काळात बायो-बबल व खेळाडंूची वारंवार होणाऱ्या चाचणीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची झालेली. साळवी म्हणाले की, मी ही संधी देण्यासाठी बीसीसीआयचे आभार मानतो. मी या संघटनेला १० वर्ष दिल्यानंतर पुढे जाऊ इच्छितो. कोविड-१९ च्या काळात २४ तास सेवा देण्याची नोकरी बनली होती व मी आता स्वत:साठी व कुटुंबासाठी वेळ देऊ इच्छितो. साळवी बीसीसीआयच्या वय पडताळणी, डोपिंग प्रतिबंधक विभाग व वैद्यकीय विभागाचे प्रभारी होते. त्यांचा राजीनामा पुढील महिन्यात होणाऱ्या मुलांच्या अंडर-१६ राष्ट्रीय चॅम्पियनशीप (विजय मर्चेंट ट्रॉफी) आधी आला. साळवी यांना ऑस्ट्रेलिया व श्रीलंकासमवेत काही दौऱ्यांवर भारतीय संघासोबत प्रवास करावा लागला. त्यांनी आयपीएलच्या दोन सत्रात व भारताच्या आयोजनात युएइमध्ये खेळवल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकासाठी वैद्यकीय व्यवस्थेची देखरेख केली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …