ठळक बातम्या

बीडमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा; ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड – जुगार अड्ड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्याची घटना बीडमध्ये घडली. या छापेमारीत तब्बल ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. बीड तालुक्यातील चऱ्हाटा फाटा येथील जुगाराच्या अड्यावर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही धाड टाकली. या धाडीत ४७ जुगाऱ्यांसह तब्बल ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. जुगार अड्ड्यावर झालेली बीड जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ५१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेत हा जुगार अड्डा भाड्याने सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मस्के यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, माझा आणि जुगार अड्ड्याचा काहीही संबंध नाही. ती जागा माझ्या मालकीची नाही, तर माझे भाऊ मदन मस्के यांची आहे, असा दावा राजेंद्र मस्के यांनी केला. सत्ताधाऱ्यांकडून मला गोवले जात आहे. पोलिसांनी कसलीही चौकशी न करता माझे नाव घेतले. मी न्यायालयात दाद मागणार, अशी प्रतिक्रिया राजेंद्र मस्के यांनी माध्यमांसमोर दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …