बीडमध्ये एसटी व ट्रकचा भीषण अपघात

  • ४ जणांचा जागीच मृत्यू, १५ जण गंभीर जखमी

बीड – बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूर-औरंगाबाद ही बस लातूरवरून निघाली होती, तर प्लास्टिक पाइप घेऊन जाणारा ट्रक हा अंबाजोगाई येथून लातूरकडे जात होता.
बर्दापूर फाट्याच्या जवळ एका वळणावरती हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही, मात्र हा अपघात इतका भीषण होता की, जागीच चार जणांचा मृत्यू झाला व १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता, त्यामुळे अंदाज आला नसावा असे बोलले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस आणि ट्रकचा एक-एका भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडीसुद्धा झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसमध्ये प्रवासी आणि एसटी चालक अडकून पडला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी चक्क क्रेन बोलवावी लागली. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजूला करून आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि एसटी चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …