बीडब्ल्यूएफ क्रमवारी : श्रीकांतचे अव्वल दहात पुनरागमन

नवी दिल्ली – विश्व चॅम्पियनशीपमधील पदकाच्या जोरावर भारताच्या किदांबी श्रीकांतला विश्व बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) च्या नव्या जागतिक क्रमवारीत चार क्रमांकाचा फायदा झाला व तो पुन्हा अव्वल दहात समाविष्ट झाला. गुंटूरच्या या २८ वर्षीय खेळाडूला स्पेनच्या हुएलवामधील चांगल्या कामगिरीचा फायदा मिळाला व तो दहाव्या स्थानी पोहचला. विश्व चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकणारा युवा लक्ष्य सेन देखील दोन स्थान पुढे १७ व्या स्थानी पोहचला, पण बी. साई प्रणीतला दोन स्थानचे नुकसान झाले असून तो १८ व्या स्थानी पोहचला. एच. एस. प्रणय विश्व चॅम्पियनशीपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंत पोहचला, जिथे त्याने सहा क्रमांकाची झेप घेतली व तो आता २६ व्या स्थानी पोहचला आहे. महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेता पी. व्ही. सिंधू सातव्या स्थानी कायम आहे, तर दुखापतीचा सामना करणारी सायना नेहवाल देखील २५ व्या स्थानी आहे. चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रंकीरेड्डी ही पुरुष दुहेरी जोडी एक क्रमांक मागे दहाव्या स्थानी सरकली, तर अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डीने महिला दुहेरीत अव्वल २० मध्ये जागा मिळवली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …