बीजिंग ऑलिम्पिक; सरकारी पथक नाही पाठवणार जपान

टोकियो – जपानने शुक्रवारी घोषणा केली की, ते बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिकसाठी आपल्या मंत्र्यांचे पथक पाठवणार नाही, पण ऑलिम्पिक अधिकारी यात भाग घेतील. चीनच्या मानवाधिकार उल्लंघनाचा रेकॉर्ड पाहता अमेरिकेच्या नेतृत्वात मिळालेल्या स्पर्धेच्या बहिष्काराला हा एकप्रकारे जपानचा पाठिंबा असल्याचे म्हटले जाते. जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाजू मस्तुनो म्हणाले की, आमचे सरकारी प्रतिनिधीमंडळ पाठवण्याचा कोणताच इरादा नाही. टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष सेइको हाशिमोतो, जपान ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष यासुहिरो यामाशिता व जपान पॅरालम्पिक समितीचे अध्यक्ष काजुयुकी मोरी यात भाग घेतील. ते म्हणाले की, हे तीन अधिकारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती व पॅरालम्पिक समितीच्या आमंत्रणावर जात आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …