ठळक बातम्या

बिहार : बेतियामध्ये विषारी दारूने घेतला ८ जणांचा बळी

बेतिया – संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह असताना बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील बेतिया जिल्ह्यात एका गावातील ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विषारी दारू प्यायल्याने ८ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत होती. काही जणांनी मोठ्या प्रमाणात मद्यपान केले. त्यानंतर त्यांची प्रकृ ती बिघडू लागली. त्यातच ८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृ ती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
ही घटना नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्षिणेकडील तेलहुआ गावात घडली आहे. मृतांमधील सर्व जण हे वॉर्ड क्रमांक २, ३ आणि ४ मधील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी या सर्वांनी दारूचे सेवन केले आणि त्यानंतर रात्री उशिरा सर्वांची तब्येत खालावण्यास सुरुवात झाली. यावेळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मृतांची नावे समोर आली असून, त्यामध्ये बच्चा यादव, महाराज यादव, हनुमंत सिंह, मुकेश पासवान, जवाहर साहनी, उमा साह, रमेश साहनी आणि राम प्रकाश यांचा समावेश आहे.
या घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे. विषारी दारू प्यायल्याने गुरुवारी ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त सिधवलिया येथील मंगोलपूर परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मदपूर गावात आणि कुशहर गावात विषारी दारू प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या ८ झाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …