बिहार : नुडल्स फॅक्टरीतील स्फोटात ७ मजुरांचा मृत्यू

पाटणा – बिहारमध्ये रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाच्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. मुजफ्फरपूर जिल्ह्यातील बेला फेज-२ मध्ये नुडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटल्यामुळे हा भीषण स्फोट झाला. यावेळी फॅक्टरीत अनेक मजूर काम करत होते. आतापर्यंत सर्वच मृतांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आलेली नाही. त्याशिवाय अनेकांचे मृतदेह भयावह स्थिती सापडले आहेत. कोणाचा फक्त हातच सापडला तर कोणाचा फक्त पाय.
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे शेजारी असलेली फॅ क्टरीदेखील उद्ध्वस्त झाली आहे. यावेळी तेथे काम करणारे दोघे जण देखील जखमी झाले आहेत. जखमींची अद्याप ओळख पटवण्यात आलेली नाही. याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, या घटनेचा तपास करण्यासाठी पाटण्याहून अधिकाऱ्यांची टीम बोलवण्यात आलेली आहे. स्फोटाचा आवाज साधारण ५ किमीपर्यंत लांब गेल्याचे सांगण्यात येत आहे. नुडल्स फॅक्टरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …