ठळक बातम्या

बिपुल शर्माचा भारतीय क्रिकेटला रामराम

अमेरिकन संघात करणार करिअर


मुंबई – भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिपुल शर्मा हे एक मोठे नाव आहे. २०१६ मध्ये आयपीएल चॅम्पियन टीम सनरायझर्स हैदराबादचा भाग असलेल्या बिपुलने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. हा ३८ वर्षीय अष्टपैलू खेळाडू पंजाब किंग्जकडूनही खेळला आहे. निवृत्तीनंतर बिपुल आता अमेरिकेत स्थायिक झाला असून, आता अमेरिकन संघात करिअर करण्याचे त्याचे लक्ष्य आहे.
मूळचा पंजाबचा असलेला बिपुल शर्मा पंजाबव्यतिरिक्त हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन संघांसाठी खेळला आहे. तो आता अमेरिकेतून खेळणार असल्याने यापुढे भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकणार नाही. बीसीसीआयच्या नियमांनुसार, परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूंना आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागते. बिपुल यूएसएमध्ये कोणती लीग खेळणार हे अद्याप समजलेले नाही, पण तेथे स्थायिक झालेल्या बहुतेक भारतीय क्रिकेटपटूंनी मायनर लीगशी करार केला आहे.
बिपुलच्या रेकॉर्डवर एक नजर
३३ आयपीएल सामन्यांत १७ विकेट घेणाऱ्या बिपुलला आयपीएल २०१६च्या अंतिम सामन्यात एबी डिव्हिलियर्सची महत्त्वाची विकेट मिळाली. तो २०१८ पर्यंत सनरायझर्स हैदराबादसोबत राहिला. बिपुलने ५९ सामन्यांत ३०१२ धावा आणि १२६ विकेट्स घेत आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. ९६ लिस्ट ए सामन्यांमध्ये या अष्टपैलू खेळाडूने १६२० धावा केल्या असून, ९६ फलंदाजांना बाद केले. त्याने १०५ टी-२० मध्ये १२०३ धावांसह ८४ बळी घेतले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment