बिटींग रिट्रीट परेड पाहून रणदीप हुड्डाला आठवण झाली भारत-पाकिस्तान मॅचची!

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा सोशल मीडियावर चांगलाच ॲक्टिव्ह असतो. तो आपल्या चाहत्यांना आपल्या रोजच्या शेड्यूलविषयीही सांगताना दिसतो. अलीकडेच रणदीपने आपल्या पालकांची इच्छा पूर्ण करण्याकरिता त्यांच्यासोबत पंजाबच्या अटारी बॉर्डरवर इंडिया-पाकिस्तानची बिटींग रिट्रीट पाहण्यासाठी पोहोचला. ही परेड पाहिल्यानंतर आपल्याला नेमके काय वाटले हे त्याने चाहत्यांबरोबर शेअर केले आहे.

हुड्डाने मीडियाशी बोलताना सांगितले की, बॉर्डरची बिटींग रिट्रीट परेड पाहणे त्याच्या पालकांची इच्छा होती. रणदीप म्हणाला, रिट्रीटदरम्यान देशाचा गौरवशाली इतिहास पाहताना त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरारले. सीमेच्या सुरक्षेसाठी खूप रक्त, घाम गाळला आहे आणि खूप सारे बलिदान देण्यात आले आहेत.
हा सोहळा पाहण्यासाठी रणदीप कुणा सेलिब्रेटीप्रमाणे नाही, तर सामान्य माणसाप्रमाणे पोहोचला. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने योग्य सीटची तरतूद केली. रणदीपचा हा मित्र सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरीस आहे. बिटींग रिट्रीट पाहण्याबरोबरच रणदीप व त्याच्या पालकांनी बीएसएफचे अधिकारी आणि जवानांसोबत वेळ घालवला व त्यांच्याबरोबर बीएसएफच्या मेसमध्ये जेवणही घेतले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …