टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये कोणी ना कोणी अतरंगी कंटेस्टंट येतच असते. हे स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करून नेहमीच चर्चेत येत असतात. यापैकीच एक असलेली बिग बॉसच्या जुन्या सिझनची स्पर्धक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि ही स्पर्धक आहे डाएंड्रा सोरेस. आपल्या बोल्ड फोटोंमुळे सध्या डाएंड्रा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
तसेच डाएंड्रा सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. आपले फोटोे आणि व्हिडीओ ती सतत शेअर करताना पाहायला मिळते. आता अलीकडेच डाएंड्राने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोत डाएंड्रा न्यूड असून, तिने आपले हात आपल्या शरीरावर ठेवलेले दिसून येतात. फोटोत डाएंड्रा एकदम रफ लूकमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर तिचा टॅटूही स्पष्टपणे दिसून येतोयं. डाएंड्राचा हा बोल्ड लूक पाहून सोशल मीडिया युझर्सनी तिची वारेमाप स्तुती केली आहे. आपल्या कमेंटद्वारे त्यांनी डाएंड्राचा अतिशय हॉट असा उल्लेख केला आहे. एका युझरने लिहिले आहे, ‘आपण तर खूप खूप हॉट आहात.’ डाएंड्रा सोरेस ही एक प्रख्यात मॉडेल आणि होस्ट आहे. ती २०१४मध्ये बिग बॉसच्या आठव्या सिझनची स्पर्धक होती. याशिवाय ती अनेक रिॲलिटी शोमध्येही दिसून आली आहे.