बॉलीवूड कलाकार प्रत्येक सण हा तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करताना दिसून येतात. मग ते ख्रिसमस तरी कसा काय असाच जाऊ देतील? महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करून चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये बिग बी सांता बनलेले दिसून येत आहेत. त्याचबरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘पीस, हार्मनी, सेफ्टी अँड लव्ह…’
अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच बॉलीवूड क्वीन कंगना राणावतनेही आपल्या कुटुंबीयांसमवेत ख्रिसमस साजरा केला. इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये फोटो शेअर करताना कंगनाने चाहत्यांनाही विश केले आहे. या फोटोत बहीण रंगोली, भाऊ, वहिनी आणि त्यांचा मुलगा दिसून येत आहेत. त्यावेळी कंगनाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. याशिवाय सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह राहणाऱ्या शिल्पा शेट्टी हिनेही चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करत शिल्पाने लोकांनी खूश राहावे म्हणून विश केले आहे. ख्रिसमस ट्रीजवळ बसलेल्या शिल्पाभोवती गिफ्ट्सही दिसून येत आहेत. आलिया भट्टनेही रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांसमवेत ख्रिसमस साजरा केला. नीतू कपूरने आलियाबरोबरचा सेल्फीही शेअर केला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …