ठळक बातम्या

बिग बींच्या या चित्रपटाचा रिमेक बनवायचाय धनुषला


तमिळ सुपरस्टार धनुष हा दक्षिणेत खूप लोकप्रिय आहे. धनुषचे हिंदीमध्ये केवळ रांझणा आणि शमिताभ हे दोनच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता त्याचा अतरंगी हा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. भलेही धनुषने बॉलीवूडमध्ये कमी काम केले असेल परंतु तरीही तो खूप लोकप्रिय अभिनेता आहे. रांझणानंतर आता तब्बल सहा वर्षांनी तो आनंद एल राय यांच्या अतरंगीमध्ये पहायला मिळणार आहे.
धनुषला जेव्हा हिंदी चित्रपट आनंद एल राय यांच्याबरोबर काम करण्याविषयी विचारणार करण्यात आली तेव्हा तो म्हणाला,’ ते माझे बंधु आहेत आणि मी त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. अतरंगी हा अत्यंत सुंदर चित्रपट आहे. असे खूप अपवादाने होते जेव्हा कुणी ॲक्टर आपला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याच्या यशाबद्दल आश्वस्त असतो.’
दरम्यान हिंदी चित्रपटांबदल तुझा काय विचार आहे असा सवाल धनुषला करण्यात आला असता तो म्हणाला,’ मी मनोरंजक कथा शोधत आहे आणि मला वेगवेगळ्या झोनरचे चित्रपट करायचे आहेत. आपल्याला राजकुमार हिरानी यांचे चित्रपट खूप आवडतात व त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे असेही धनुषने सांगितले.
धनुषने बिग बींसोबत शमिताभमध्ये काम केले होते. अमिताभ बच्चन यांच्याही चित्रपटाचा रिमेक बनवण्याची इच्छा असल्याचे सांगाताना धनुष म्हणाला,’ माझी अमितजींचा चित्रपट शराबीचा रिमेक बनवण्याची इच्छा आहे. ती एक आव्हानात्मक व्यक्तीरेखा आहे आणि मला हे चॅलेंज स्विकारायचे आहे.’

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …