ठळक बातम्या

बाहुबलीची शिवगामी देवी बनणार बिग बॉस तमिळची होस्ट

बाहुबलीसारख्या चित्रपटात शिवगामी देवीच्या भूमिकेत दिसून आलेली दिग्गज अभिनेत्री राम्या कृष्णन आता बिग बॉस तमिळचे होस्टींग करताना दिसून येणार आहे. रिॲलिटी शो बिग बॉस तमिळच्या पाचव्या सीझनच्या होस्टच्या रूपात राम्याची एंट्री झालेली आहे. आतापर्यंत हा शो दिग्गज अभिनेता कमल हसन होस्ट करत होते, परंतु अलीकडेच ते कोरोना संक्रमित झाले असून, अद्याप त्यांची प्रकृती पूर्णपणे ठिक झालेली नाही. त्यामुळे शोच्या मेकर्सनी शो पुढे नेण्यासाठी अभिनेत्री राम्या कृष्णनला बिग बॉस तमिळचा नवा होस्ट बनवले आहे.

बिग बॉस तमिळने या शोचा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यात राम्या ही शोमध्ये एंट्री करताना दिसून येतेय. बॅकग्राऊंडला बाहुबलीचे संगीतही कानावर पडते. त्याचबरोबर कमल हसन राम्याचे स्वागत करतानाही दिसून आलेत. राम्याच्या एंट्रीने शोमधील अनेक स्पर्धक कमालीचे उत्साहित झाले आहेत. राम्या कृष्णन ही शिवगामीच्या रूपातील आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखली जाते.
वयाच्या १४व्या वर्षी तमिळ चित्रपट वेल्लई मनासुद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या राम्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदीतील सुमारे २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम्याने यश चोप्रा यांच्या परंपरा या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …