ठळक बातम्या

बासू चॅटर्जी आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यासारखे चित्रपट बनवायचेत -विवेक सोनी

अनेकदा फिल्ममेकर्स आपले अनुभव चित्रपटांमध्ये घालून कथेला विलक्षण आणि विश्वसनीय बनवण्याचा प्रयत्न करत असतात. दिग्दर्शक विवेक सोनी यांनीदेखील आपला आगामी चित्रपट मीनाक्षी सुंदरेश्वरमध्ये आपले अनुभव घालण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अभिमन्यू दसानी हा इंजिनिअरच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना विवेक म्हणाले, ‘मी इंजिनिअर आहे. मी हैदराबादमध्ये चार वर्षांचे शिक्षण घेऊन इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. या प्रवासाबद्दल मी पूर्णपणे जाणून होतो, कारण मी ते आयुष्य जगले आहे. चित्रपटात मी अशा अनेक गोेष्टी ठेवल्या आहेत, ज्या इंजिनिअरिंगच्या दिवसांद्वारे प्रेरित आहेत.’ मीनाक्षी सुंदरेश्वर रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. विवेक म्हणतात, ‘मला लव्ह स्टोरी ड्रामा खूप आवडत आहे. माझ्या मनात नेहमी असायचे की, माझा पहिला चित्रपट लव्ह स्टोरी असावा. लाँग डिस्टन्स रिलेशनशीपची जी थीम चित्रपटांमध्ये आहे, त्याच्याशी प्रेक्षक स्वत:ला सहजपणे जोडू शकतील.
विवेक सोनी पुढे म्हणाले, आपल्या पैकी कोणी ना कोणी एखाद्या लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये राहिले असेल. खरेतर मी ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांच्या चित्रपटांचा प्रशंसक आहे. जेव्हा मी मोठा होत होतो, तेव्हा मी त्यांचे खूप सिनेमे पाहिले आहेत. कुठे ना कुठे तरी डोक्यात त्या प्रकारच्या चित्रपटांची प्रतिमा होती. त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा खूप गोड असायच्या. त्यामुळे या चित्रपटाची कथा लिहिताना त्यांचे जग आणि त्यांच्या सारख्या व्यक्तिरेखा मी क्रिएट केल्या आहेत.’ हा चित्रपट थेट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …