बाळाच्या जन्मासाठी नागपूरमधील तरुणीला उज्जैनमध्ये १६ महिन्यांची कैद आणि अत्याचार

उज्जैन – मध्य प्रदेशातील उज्जैनमधून एक अत्यंत भयावह प्रकरण समोर आले आहे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एका दाम्पत्याने १९ वर्षीय तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी १९ वर्षीय तरुणी रस्त्यावर बेशुद्धावस्थेत दिसून आली. सुरुवातीला तिच्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. सर्वात आधी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ दिवसांनंतर तिला शुद्ध आली. त्यानंतर समुपदेशनादरम्यान या तरुणीने धक्कादायक खुलासा केला. पीडितेने यावेळी तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तिने सांगितले, अनेक दिवस तिच्यावर अत्याचार केला जात होता. सोबतच सरोगसी (उसने मातृत्व)साठी जबरदस्तीही केली जात होती. पीडितेने सांगितले की, आरोपी राजपाल सिंहच्या पत्नीने दोन मुलांनंतर नसबंदी केली होती. मात्र काही वर्षांपूर्वी दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दाम्पत्याला बाळाची अपेक्षा होती. यानंतर आरोपी राजपाल सिंह आणि त्याच्या पत्नीने तिला घरात कैद केले आणि महिनो महिने तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
आरोपी राजपाल सिंहने तिला आधी बहिणीच्या घरी ठेवले होते. त्यानंतर तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथे तिच्यावर बलात्कार केला जात होता. यादरम्यान पीडिता गर्भवती राहिली. तर आरोपीची आई आणि पत्नीने तिची काळजी घेण्यास सुरुवात केली. तिची नियमित तपासणी केली जात होती. यादरम्यान आरोपी राजपाल सिंहच्या ४२ वर्षीय पत्नीने गर्भवती असल्याचे नाटक केले. ९ महिन्यांनतर पीडितेला एका रुग्णालयात सिंह याच्या पत्नीच्या नावाने दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रियेनंतर तिने एका बाळाला जन्म दिला. आरोपीने पीडितेकडून बाळ घेतले. प्रसूतीवेळच्या शस्त्रक्रियेनंतर तिला संसर्ग झाला होता. त्याच अवस्थेत तिला देवास गेटवर फेकून देण्यात आले. पीडितेने हा खुलासा केल्यानंतर आरोपी दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …