ठळक बातम्या

बार्टीची डब्ल्यूटीए प्लेअर ऑफ द इयर म्हणून निवड

सेंट पीटर्सबर्ग – विंबल्डन चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू ॲश बार्टीची दुसऱ्यांदा डब्ल्यूटीए प्लेअर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. बार्टीला २०१९ मध्येही डब्ल्यूटीएचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. या मोसमात तिने विम्बल्डन व्यतिरिक्त एकूण पाच विजेतेपदे जिंकली असून, सलग तिसऱ्या मोसमात ती प्रथम क्रमांकावर राहिली आहे.
याबरोबरच बारबोरा क्रेजसिकोवा हिला सर्वोत्तम सुधारणा करणारी खेळाडू म्हणून निवडण्यात आले. बारबोरानेमंगळवारी कॅटरिना सिनियाकोवासोबत दुहेरीचा वर्षातील सर्वोत्तम संघाचा पुरस्कारही मिळवलेला आहे. केजिसकोवा २००० सालानंतर पहिली महिला खेळाडू आहे, जिने फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते. एम्मा रदुकानू हिला वर्षातील नवोदित खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. तिनेवयाच्या १८व्या वर्षी यूएस ओपनचेविजेतेपद पटकावले. पात्रता फेरीतून पुढेजाऊन ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारी ती पहिली खेळाडू आहे. कार्ला सुआरेझ नॅवारो हिला उत्कृष्ट रिटर्निंग प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …