बायकोला कुरूप बनवण्यासाठी नवरा करतो भयानक कृत्य

दक्षिण आफ्रिकेतील मुर्सी जमातीच्या लोकांच्या खूप विचित्र प्रथा आहेत. हे लोक त्यांच्या विचित्र परंपरांमुळे चर्चेत राहतात. या जमातीचे लोक महिलांना इतरांच्या नजरेपासून वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत भयानक कृत्ये करतात. येथील महिलांना कुरूप बनवण्यासाठी त्यांच्या तोंडात मोठी चकती टाकून त्यांच्या तोंडाचा आकार वेडावाडा करून टाकतात.
जगातील प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी महिला अनेक प्रकारचे ब्युटी ट्रिटमेंट घेतात. प्रत्येक पुरुषाला आपली पत्नी सुंदर दिसावी असे वाटते, पण तुम्ही कधी ऐकले आहे का की, काही ठिकाणचे लोक जाणूनबुजून त्यांच्या कुटुंबातील महिलांना अनाकर्षक बनवतात? होय हे खरे आहे. मुर्सी जमातीच्या महिलांचे विचित्र विधी आहेत. यामुळे तेथील बायका कुरूप होतात. जुन्या परंपरेनुसार या जमातीतील महिला त्यांच्या ओठात एक मोठी चकती चिकटवतात.

मुर्सी जमात ही आदिवासी जमात आहे. त्यांच्या अनेक परंपरा विलक्षण आहेत. यातील काही जमाती भयंकरही आहेत. काही जमातींमध्ये महिलांना खूप महत्त्व दिले जाते, तर काहींमध्ये त्यांच्यावर अत्याचार केले जातात. अशीच एक जमात म्हणजे मुर्सी. मुर्सी जमात दक्षिणेकडील इथिओपियाच्या जंगलात राहते. त्यांना जगातील सर्वात धोकादायक जमात मानले जाते. ही जमात महिलांवरील अत्याचारासाठी कुप्रसिद्ध आहे.
मुर्सी जमातीच्या महिलांना बॉडी मॉडिफिकेशन करावे लागते. या जमातीतील पुरुष आपल्या स्त्रियांना अनाकर्षक बनवण्यासाठी विविध रांगड्या गोष्टी करतात. यासाठी ते महिलांच्या ओठात गोल लाकूड घालतात. त्यामुळे महिलांचे ओठ लटकतात. पुरुषांचा असा विश्वास आहे की, जर स्त्रिया अनाकर्षक दिसल्या तर त्यांना कुणीही पाहणार नाही. येथील स्त्रियाही मनात कोणत्याही प्रकारचा किंतुपरंतु न बाळगता या परंपरांचे पालन करून कुरूप व्हायला हसत हसत तयार होतात.

मुर्सी जमात ही जगातील सर्वात धोकादायक जमात मानली जाते. हे लोक कोणाचीही हत्या करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना मारणे ही अभिमानाची बाब आहे. ते मारण्यासाठी धोकादायक शस्त्रे बनवतात. जंगलातून लाकूड आणून हे शस्त्र बनवले जाते. ही शस्त्रे एवढी धारदार असतात की, त्यांचा वापर करून क्षणार्धात कोणाचाही जीव घेऊ शकतात. इथिओपियामध्ये मुर्सी जमातीचे सुमारे १० हजार लोक राहतात. त्यांच्या हद्दीत कोणी विनापरवाना गेला, तर त्याचा मृत्यू निश्चित आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …