ठळक बातम्या

बाप से बेटी सवाई…

बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर त्यामध्ये आलिया भट्टचे नाव आवर्जून घ्यायला हवे. अतिशय कमी कालावधीत तिने आपले नाव एका ब्रँडच्या रूपात बदलून टाकले आहे. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर तिने अल्पावधीतच खूप मोठा पल्ला गाठला आहे. मुलीच्या वाट्याला आलेले यश पाहून महेश भट्ट यांच्या डोळ्याचेही पारणे फिटले आहे.

आलियाने या संदर्भात एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना महेश भट्ट म्हणाले,
आता आलियाला आमची गरज नाहीयं. आलियात पुढे जाण्याची प्रचंड कुवत आहे. मी कायम घर चालवण्याकरिता चित्रपट बनवले आहेत. परंतु आलियाचे मात्र तसे नाहीयं. तिने आपल्या कठोर मेहनतीने आणि मन लावून काम करण्याच्या स्वभावावर इतका मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ती खूप समजूतदारही आहे.

महेश भट्ट यांनी सांगितले की, आलिया जेव्हा छोटी होती तेव्हा ५०० रुपयांकरिता आपल्या डॅडीच्या पायांना क्रिम लावायची. परंतु आज तिने आपल्या मेहनतीच्या बळावर इतका पैसा कमवला आहे जितका मी ५० वर्षांमध्येही कमवू शकलो नाही.
आलियाने अलीकडेच पुढे जाण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत आपल्या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली आहे. तिने आपल्या या प्रोडक्शन हाऊसचे नाव इंटरनॅशनल सनशाईन प्रोडक्शन हाऊस ठेवले आहे. तेव्हापासून आलियाचा त्या अभिनेत्रींमध्ये समावेश झाला आहे ज्यांचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …