बांगलादेशची दमदार फलंदाजी : दुसऱ्या दिवसअखेरीस २ बाद १७५ धावा

माऊंट माँगानुई – बांगलादेशने न्यूझीलंडला चांगलाच घाम फोडला आहे. महमुद्दालाह हसन जॉय (नाबाद ७०) आणि नजमुल होसेन शँटो (६४) या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी रचलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर बांगलादेशने माऊंट माँगानुई कसोटीत दुसऱ्या दिवसअखेरीस २ बाद १७५ धावा उभारल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात उभारलेल्या ३२८ धावांचा पल्ला ओलांडण्यासाठी बांगलादेशला अद्यापही १५३ धावांची गरज आहे.

डेवन कॉन्वेने पहिल्या दिवशी शतक झळकावत न्यूझीलंडला वर्चस्व मिळवून दिले होते, पण दुसऱ्या दिवशी किवी संघाचा डाव फार काळ लांबला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना केवळ ७० धावा जोडता आल्या. अर्धशतक झळकावणाऱ्या हेन्री निकोल्सचा (७५) अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. अंतिम पाच फलंदाज केवळ २५ धावांची भर घालून परतले. अर्धशतकवीर निकोल्सच्या खेळीत १२ चौकारांचा समावेश होता. बांगलादेशकडून शोरिफुल इस्लाम व मेहदी हसन मिराजने प्रत्येकी ३ बळी घेतले, तर कर्णधार मोमिनुल हक अिाण एब्दत हुसेनने अनुक्रमे २ व १ बळी घेतले.
बांगलादेशने प्रत्युत्तरात खेळताना ४३ धावांवर पहिला फलंदाज गमावला. डावखुऱ्या नील वॅगनरने स्वत:च्या गोलंदाजीवर शादमान इस्लामचा (२२) झेल टिपला. जॉय अणि शँटो या जोडीने त्यानंतर दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडला घाम फोडला. शँटोने ९०, तर जॉयने १६५ चेंडूंत अर्धशतक झळकावले. वॅगनर पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावला आणि त्याने शँटोला माघारी धाडले. जॉय-शँटो जोडीने दुसऱ्या गड्यासाठी १०४ धावा जोडल्या. शँटोने ७ चौकार आणि १ चौकाराने खेळी सजवली. दिवसअखेरीस ७ चौकारांसह ७० धावांवर जॉय व कर्णधार मोमिनुल हक (८) खेळत आहेत.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …