बसपा अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

लखनऊ – निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वीपासूनच उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पार्टीने (बसपा) मोठी घोषणा केली आहे. बसपा सुप्रीमो मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी देखील उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. तसेच, माझी पत्नी कल्पना मिश्रा आणि माझा मुलगा कपिल मिश्राही निवडणूक लढवणार नाहीत. मायावती यांचा भाचा आकाश आनंदही निवडणूक लढवणार नाही, असे बसपाचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी सांगितले.
याचबरोबर, सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशात बसपाचे सरकार स्थापन होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी भाजप आणि समाजवादी पक्षात लढत आहे. निवडणुकीपूर्वी किंवा नंतर बसपाची कोणाशीही युती होणार नाही.
ते पुढे म्हणाले की, यूपीचे ब्राह्मण आमच्यासोबत आहेत. ब्राह्मण भाजपासोबत जाऊ शकत नाही आणि ब्राह्मण समाजवादी पक्षात कधीच नव्हता. त्यांचे वास्तव त्यांना माहीत आहे. भाजप सरकारमध्ये ब्राह्मण समाजातील ५०० हून अधिक लोकांची हत्या झाली. १०० हून अधिक एन्काउंटर झाले. बसपाने त्यांचा सन्मान कसा वाढवला हे ब्राह्मण समाजानेआधीच पाहिले आहे. सर्वच ठिकाणा ब्राह्मणांना सन्मान देण्यात आला आहे, असे सतीश चंद्र मिश्रा म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …