ठळक बातम्या

बर्फात अडकलेल्या कुत्र्यासाठी देवदूत बनून आले पोलीस

सध्या सोशल मीडियावर स्पेनच्या दोन हिरो पोलीस कर्मचा‍ºयांची खूप चर्चा आहे. या पोलिसांनी जीवावर खेळून बर्फाळ पाण्यात गोठलेल्या कुत्र्याचा जीव वाचवला. वास्तविक, कुत्रा बर्फाळ तलावात पडला होता. यानंतर तो मृत्यूची वाट पाहत असताना पोलीस देवदूताच्या रूपात समोर आले आणि त्यांनी कुत्र्याचा जीव वाचवला.
थंड हवामानात नळाच्या पाण्याला स्पर्श करतानाही माणूस शंभर वेळा विचार करतो. अशा परिस्थितीत, बर्फाळ पाण्यात संपूर्ण शरीर गोठवल्यामुळे होणाºया वेदनांची कल्पना करा. विशेषत: कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी कुणीतरी या बर्फाळ पाण्यात डुबकी मारली, तर प्रकरण काही वेगळेच होते. सध्या सोशल मीडियावर स्पेनमधून एक प्रकरण समोर येत आहे. या प्रकरणाचे फुटेजही चांगलेच व्हायरल होत आहे. या फुटेजमध्ये दोन स्पॅनिश पोलीस बर्फाळ पाण्यात उडी मारून एका कुत्र्याचा जीव कसा वाचवत आहेत हे दाखवण्यात आले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर झाला आहे. धाडसी पोलिसांनी कपडे काढून बर्फाळ तलावात उडी घेतली. यानंतर, अडकलेल्या कुत्र्याला बाहेर काढण्यात आले. ही क्लिप ७ डिसेंबर रोजी स्पेनमध्ये कॅप्चर करण्यात आली होती. कुत्रा बर्फावर आरामात स्केटिंग करत होता. मग बर्फ एका ठिकाणाहून कमकुवत झाला आणि कुत्र्याच्या वजनामुळे तुटला. बर्फ तुटल्यानंतर कुत्रा आत अडकला. सेरो नावाच्या या कुत्र्याचा बर्फाच्या पाण्यामुळे मृत्यू झाला असता, पण हिमतीने उडी मारून शूर रक्षकांनी त्याचा जीव वाचवला.
व्हायरल व्हिडीओमध्ये सिव्हिल गार्ड एजंट तलावात उडी मारून बर्फ तोडताना दिसत आहे. तो एका मोठ्या काठीने बर्फ तोडत होता. एकट्याला फारसे यश मिळत नव्हते. हे पाहिल्यानंतर गार्डच्या साथीदारानेही कपडे काढून तलावात उडी मारली. दोघांनी मिळून बर्फ तोडला आणि कुत्र्याला बाहेर काढले. स्पॅनिश मीडियानुसार, पोलिसांना रात्री ११ वाजता बर्फात अडकलेल्या कुत्र्याची माहिती मिळाली. तलावात अडकल्यानंतर कुत्रा मदतीसाठी ओरडत होता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यापासून तोे हजारो वेळा पाहिला गेला आहे. तो १ी्रिि३ वर शेअर केला होत. स्पेनमध्ये पोलीस कर्मचाºयांनी कुत्र्याचा जीव कसा वाचवला, असे कॅप्शन लिहिले होते. परदेशात अशी अनेक प्रकरणे आहेत, जिथे कुत्रे अशा प्रकारे बर्फाळ नदीत अडकून आपला जीव गमावतात. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या कुत्र्यांना अशा ठिकाणांपासून दूर ठेवण्यास सांगितले जाते. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी त्यांचे असेच अनुभव शेअर केले. मात्र, सध्या या दोन पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …