जबरदस्त कॅच घेत सर्वांना केले थक्क
मेलबर्न – अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दरम्यान अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मार्कस हॅरिसच्या रूपाने प्रारंभीच झटका बसला. अवघ्या चार धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट गेली. धमाकेदार सुरुवात करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांवर विकेटकिपर जोस बटलरने पाणी फिरवले. बटलरने डाव्या बाजूला सूर मारून हॅरिसरचा जो झेल घेतला, त्याला तोड नाही.
इंग्लिश गोलंदाजांनी टिच्चून मारा केला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात झाली. धावांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता. डावखुरा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला इंग्लिश गोलंदाजांनी जखडून ठेवले. वॉर्नर आणि हॅरिसची जोडी ब्रॉडने फोडली. आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ब्रॉडने हॅरिसला तंबूत पाठवले. हॅरिस अवघ्या तीन धावांवर बाद झाला. हॅरिस सहजतेने बाद झाला नाही. या विकेटचे सर्व श्रेय विकेटकिपर जोस बटलरचे आहे. हॅरिसचा झेले पकडणे इतके सोपे नव्हते. ब्रॉड हॅरिसला राऊंड द विकेट गोलंदाजी करीत होता. त्याने शॉर्ट पीच बॉल टाकला. त्यावर हॅरिसला पुलचा फटका खेळायचा होता, पण चेंडू ग्लोव्हजला लागून यष्टीपाठी गेला. बटलरने लगेच डाव्या बाजूला झेपावून एक अप्रतिम झेल घेतला. या अप्रतिम विकेटकिपिंग कौशल्यासाठी बटलरचे कौतुक होत आहे. हॅरिस बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशने यांनी सावध खेळी करीत संपूर्ण सेशन खेळून काढले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
2 comments
Pingback: unicc alternative
Pingback: 토렌트 다운